तेर/ प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी येथील ६५  वर्षीय वृध्द इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक २८ रोजी  सकाळच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की ,कोळेवाडी ता. उस्मानाबाद येथील उतरेश्वर दगडू आकोसकर वय  65 यांनी रहात्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी  दिलेल्या खबरीवरुन ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.काँ सोनवणे करीत आहेत.

 
Top