उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
 सर्व निवृत्ती वेतन धारकांनी त्यांची बँक खाती राष्ट्रीयकृत बँकामध्येच उघडण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत.
 त्या अनुषंगाने उस्मानाबाद पंचायत समिती येथून निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या ज्या निवृत्तीवेतनधारकांची  खाती 1) भारतीय स्टेट बँक 2) इंडियन बँक 3) बँक ऑफ महाराष्ट्र 4) बँक ऑफ इडिया 5) पंजाब नॅशनल बँक 6) सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया 7) आंध्रा बँक 8) कॉपोरेशन बँक 9) इंडियन ओव्हरसीज बँक 10) युनियन बँक ऑफ इंडिया 11) बँक ऑफ बडोदा 12) कॅनरा बँक या बँका व्यतिरिक्त अन्य बँकेत आहेत त्यांनी आपली निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेनधारकांची खाते वरील राष्ट्रीयकृत बँकेत तात्काळ उघडून त्याचा क्रमांक निवृत्तीवेतनासाठी पंचायत समिती, उस्मानाबाद कार्यालयास  द्यावा.
आपण राष्ट्रीयकृत बँकेत खाते न उघडल्यामुळे निवृत्ती वेतनास विलंब झाल्यास अथवा अन्य अडचणी  संदर्भात हे पंचायत समिती, उस्मानाबाद कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top