ढोकी (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील एम टी एस ओलंपियाड राज्यस्तरीय शासनमान्य स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा शालेय शिक्षण समिती व शाळेच्या वतीने त्यांचा मेडल, प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एमटीएस परीक्षेसाठी जि. प. कन्या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी च्या 31 मुली बसल्या होत्या. त्या सर्वच 31 मुली उत्तीर्ण होत उत्तुंग भरारी घेत 7 मुलींनी मेडल मिळवत यशस्वी झाल्या. तर इतर विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाल्या. यामध्ये ईश्वरी साळुंखे (सिल्वर मेडल रँक 3), मृण्मयी देशपांडे (सिल्वर मेडल रँक 3), सिद्धी लंगडे (सिल्वर मेडल रँक 3), ईश्वरी सोनार (सिल्वर मेडल रँक 4), भक्ती तिवारी (ब्राँज मेडल रँक 1), कार्तिका भोळे (ब्राँज मेडल रँक 3) व कार्तिका कांबळे (ब्राँज मेडल रँक 8) यांनी पदके पटाकावली. तर शिवानी वाकुरे, सिद्धी वाकुरे, सोफिया कोतवाल,राजनंदिनी लोहार,धनलक्ष्मी धाकपाडे,अदिती तिवारी, श्रावणी दुरांडे,आनम कोतवाल,ईश्वरी गाढवे,रामेश्वरी लोहार,आशा देशमाने,अस्मिता कोकाटे,अंकिता सूर्यवंशी,अमृता साळुंखे,श्रावणी गवळी, तनिष्का सोनार,आकांक्षा लंगडे,समृद्धी दुरांडे,पायल कोष्टी, सृष्टी गडकर,कल्याणी गाडेकर,अदिती जाधव,सायली धावारे,श्रावणी कोळी. पहिल्याच वर्षी सर्व विद्यार्थी यशस्वी झाले.या गुणवंत विद्यार्थीयांना मेडल, प्रमाणपत्र, परीक्षा पॅड, रजिस्टर, पेन देऊन यांचा सत्कार ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे, माजी पंस सदस्य संग्राम देशमुख, शिक्षण समिती अध्यक्ष दौलत गाढवे, पोलीस पाटील राहुल वाकुरे, पत्रकार तथा पालक शशिकांत भुतेकर, बालाजी लंगडे, कुमार शिंदे,रंगनाथ वाकुरे, हरि तिवारी, यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच यशस्वी विध्यार्थी यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मुख्याध्यापक राजेंद्र माने, भारत गर्जे, अभिजीत धाबेकर, माधुरी कंठीकर, अनुराधा जगदाळे, श्रीमती जयश्री माळी, श्रीमती धनश्री पडवळ. यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी बाळू कांबळे, गजानन सोनार, कुंदन भोळे, लोमटे, लोहार यांच्या सह माता - पालक मोठया संख्येने उपस्थित होते.