तेर/प्रतिनीधी-
तेर येथील रहेमान काझी यांचा सामाजिक उपक्रमाचा सर्वानी आदर्श घेण्यासारखा आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यानी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे अमरसिंह पाटील मिञमंडळ व रहेमान (भाई)काझी मिञमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंञी अजित पवार,सामाजिक न्याय मंञी धनंजय  मुंडे,खा.ओमराजे निबांळकर यांच्या वाढदिवसानीमीत्त कोरोना महामारीत महत्वपूर्ण योगदान देणा-या कोरोना योद्धाना पीपीई किट,टेम्प्रेचर मशीन,एन-95 मास्क,फेडशील्ड,आँक्सिमिटर,आर्सेनिकम अल्बम 30,हँडग्लोज,रेनकोट,धञी,सँनिटायझर या वस्तुंच्या वितरण प्रसंगी सक्षणा सलगर या बोलत होत्या.
यावेळी आ.कैलास पाटील,गटविकास अधिकारी सम्रध्दी दिवाणे,डाँ.जयराजे निंबाळकर,राजाभाऊ शेरखाने,उमेश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद तालुका शिवसेना प्रमुख सतीष सोमाणी,महेश पोतदार यांची प्रमुख उपस्थीती होती.सुञसंचलन रविंद्र केसकर यानी केले तर आभार संयोजक रहेमान काझी यानी मानले.यावेळी तेर सोसायटीचे चेअरमन रीयाज कबीर,बाबूराव नाईकवाडी,शिवाजी चौगुले,मंगेश पांगरकर,माजीद काझी,नामदेव कांबळे,नावेद कबीर,  मुसेब काझी,दाऊत बागवान,फैसल काझी,मनोज सोमाणी,अब्दूल बागवान,प्रतिक नाईकवाडी,झिया काझी,अविनाश इंगळे,चंद्रकांत माळी आदी उपस्थीत होते.
 
Top