धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू असलेले धनगर समाजातील चार युवकांचे बेमुदत अमरण उपोषण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणानंतर व मुंबईत बैठक लावण्याच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शाम तेरकर, कमलाकर दाणे, समाधान पडुळकर व राजू मैंदाड हे चारजण सोमवार दिनांक 15 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या सहाव्या दिवशी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून उपोषणा संदर्भात माहिती घेतली व उपोषणकर्त्याला संवाद साधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपोषण करते शाम तेरकर यांच्याशी मोबाईलवर सविस्तर चर्चा केली व विषय समजून घेऊन तो सोडवण्यासाठी मंत्रालयामध्ये आठ दिवसाच्या आत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार रविवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्र्याचे दोन प्रतिनिधी धाराशिव शहरात पोहोचले त्यामध्ये बाळासाहेब किसवे व योगेश केदार यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश उपोषण कर्त्यांना सांगितला. सरकारच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी त्यांच्या हस्ते उपोषण कर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंखे, भारत डोलारे, दत्ता बंडगर, राजाभाऊ वैद्य, इंद्रजीत देवकते, डॉक्टर गोविंद कोकाटे, प्रा. मनोज डोलारे, प्रा. सोमनाथ लांडगे, इंद्रजीत देवकते, लिंबराज डुकरे, श्रीकांत तेरकर,मुकुंद घुले, बालाजी तेरकर, अमोल मैंदाड, सुभाष मैंदाड, संतोषकुमार वतने, बालाजी वगरे, गणेश एडके, श्रीमंत डुकरे, प्रशांत आरसुळे, राघवेंद्र गावडे, अक्की बर्वे, सचिन चौरे, हनुमंत डुकरे, स्वप्नील सोनटक्के, अमोल भोजने, कैलास लवटे, नितीन लवटे, शुभम नरटे, समाधान लहाडे, रवी देवकते, अक्षय भांगे, बालाजी गडदे, व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.