परंडा (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त,नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पै.नवनाथअप्पा जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे रुग्णांना बिस्किट व फळे वाटप करण्यात आले.
नंतर प्रसिद्ध सुफीसंत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन यांच्या दर्गाह वर चादर अर्पण करून जवळच असणाऱ्या मदरसा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. तसेच आपला आधार वृद्धाश्रम येथे जाऊन 2 पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या. अशा विविध सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीडिया सेल विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम हन्नूरे, परंडा तालुका अध्यक्ष अमोल काळे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब बारस्कर, शहर अध्यक्ष जावेद पठाण,विजय पाटील, तालुका युवक अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, युवक परंडा शहराध्यक्ष शुभम पाटील, दाऊद शेख, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष गणेश सांगोळे, माऊली वारे, संतु काका, कैलास झिरपे, शिवाजी व्यवहारे, सामाजिक न्याय शहराध्यक्ष भाग्यवंत शिंदे, लहू डाखवाले, शंकर खैरे, चंद्रकांत जगताप, धर्मराज गटकुळ, अश्रू नलावडे, सिद्धेश्वर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.