उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दिव्यांगाचे कैवारी,निराधाराचा आधार ,शेतकऱ्यांच्या पोशिंदा ,आक्रम अंदोलनाचे प्रणेते आदरणीय राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
प्रारंभी  सकाळी सह्याद्रि हॉस्पिटल येथे 11 दिव्यांगाचे रक्तदान सपन्न झाले त्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाखेच्या वतीने नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला ,बच्चु भाऊ यानी आव्हान केल्या प्रमाणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली सेल्फी गिफ्ट अभियाना राबविन्यात आले यामध्ये एकूण 470 व्यक्तिनी आप आपला सेल्फी पाठवून सहभाग नोंदवाला, संघटनेच्या माध्यमातून 100 व्यक्तिनां सॉनिटाझर,50 फेस शील्ड ,7500 आर्सेनिक गोळ्या ,दिव्यांग व्यक्तिनां साहित्य वाटप,बच्चु भाऊ यांच्या जीवनावर आधारित 200 पुस्तकाचे वाटप,विविध क्षेत्रातील काम/सेवा देणाऱ्या एकूण 20घटकातील 50 लोंकाचा गौरव करण्यात येणार आहे.
संघटनेच्या अनोख्या सेल्फी गिफ्ट अभियाना हा राज्यातील अभिनव उपक्रम ठरला यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रहार संघटनेचे राज्यकार्यकारिणी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाउपाध्यक्ष नवनाथ मोहिते,जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,शहराध्यक्ष जमीर शेख,दिव्यांग कर्मचारी चे रोहिदास भिसे,तुळजापुर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे,नागेश कुलकर्णी, शिवकुमार माने,ज्योतिलिंग घोडके आदिनी केले.

 
Top