तेर/प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रूग्णालयातून शुक्रवार दि 3 जुलै रोजी पाठविण्यात आलेल्या 11 स्वँबच्या नमुन्या पैकी इर्ला ता. उस्मानाबाद येथील एकजणाचा अहवाल पाँझिटीव्ह आला असून तर उस्मानाबाद येथील खोरी गल्लीत राहणा-या एका महिलेचा अहवालही पाँझिटीव्ह आला आहे. इर्ला येथील आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या पत्नीचा अहवाल इन्क्लूझिव्ह आला असून  आठ जणाचे तपासणी अहवाल प्रलंबित असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कोठावळे यांनी सांगितले. 
इर्ला ता.उस्मानाबाद येथील महिलेस श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी तेरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते या महिलेच्या स्वँबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला. होता तो इनक्लुजीव्ह आला होता त्यानंतर या महिलेसह तिच्या पतीच्या स्वँबचे नमुने शुक्रवार दि.3 जुलै रोजी पाठविण्यात आले होते परंतु रविवार दिनांक 5 जुलै रोजी  त्यामध्ये पतीचा अहवाल पाँँजिटिव्ह आला आहे तर पत्नीचा अहवाल इनक्लुजीव्ह  आल्याने पत्नीचे स्वँबचे नमुने परत  पाठविण्यात येणार असल्याचे डॉ सचिन कोठावळे यांनी सांगितले
तर शुक्रवारी सांयकाळी तडवळा येथील 9 जणांचे नमुने तेर ग्रामीण रुग्णालयातून  पाठविण्यात आले होते.  त्यापैकी उस्मानाबाद येथील खोरी गल्लीत राहणारी  एक महिला पाँझिटीव्ह आली असून उर्वरित 8 जणाचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान इर्ला येथे कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत .

 
Top