उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शनिवारी व रविवारी सलग दोन दिवशी कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्णांच्या बळींची संख्या १४ झाली आहे. त्या संदर्भात   जिल्हा शल्यचिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांना विचारले असता यास दुजोरा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  जिल्हयात कोरोना रूग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनासहीत अरोग्य विभाग योग्य ती दक्षता घेत आहेत. जिल्हयात आतापर्यंत २६८ रूग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १८६ रूग्ण बरे झाले आहेत तर ६९ रूग्णांवर जिल्हयात उपचार चालू आहेत. जिल्हयातील बळींची संख्या आता एकुण १४ झाली आहे. शनिवारी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील रूग्णांचा मृत्यू झाला तर रविवारी पहाटे परंडा तालुक्यातील आसू गावच्या ३८ वर्षीय रूग्णांचा मृत्यू झाला. सलग दोन दिवस शासकीय रूग्णांलयातील रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळी उडाली आहे.
  त्यात शनिवारी लगभग १३ रुग्णाची भर पडली आहे. विशेष म्हणजे आणखी   17 रिपोर्ट पेंडिंग  आहेत. त्याचा आज  रिपोर्ट येण्याची संभावना वर्तविण्यात येत आहे.

 
Top