उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील राम नगर, माळी गल्ली, झोरी गल्ली भागात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित भागास खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील, नगरीचे नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, मुख्यधिकारी हरिकल्याण येलगट्टे, तहसीलदार गणेश माळी उपस्थित होते.
या भागातील नागरिकांशी चर्चा करून आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. तसेच नागरिकांना प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे खासदार साहेबांनी आवाहन केले.
यावेळी तालुका प्रमुख सतिषकुमार सोमाणी, रवी कोरे, नगसेवक सोमनाथ गुरव, नगसेवक अक्षय ढोबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एवळे, नगरपालिकाचे डॉ.खान, आनंद नगर पोलिस स्टेशचे पोलिस निरिक्षक श्री. सतिष चव्हाण, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top