उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 दिनांक 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत वृक्षलागवड पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे, तहसीलदार उस्मानाबाद श्री.गणेश माळी,गटविकास अधिकारी उस्मानाबाद श्रीमती समृध्दी दिवाने,नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री.रुकमे,तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव,वन परिक्षेत्र अधिकारी श्री.पवार तसेच कामेगावचे सरपंच व सदस्य व ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच तलाठी, ग्रामसेवकाच्या उपस्थितीत कामेगाव ता. उस्मानाबाद येथे दिनांक 8 जुलै 2020 रोजी श्रमदान करण्यात आले. सदर श्रमदाना करिता जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग, तहसील कार्यालय उस्मानाबाद येथील सर्व अधिकारी /कर्मचारी यांनी महाश्रमदानातून 800 खड्ड्यांचे खोदकाम करण्यात आले.
 तसेच यापुढील श्रमदानाचा कार्यक्रम कामेगाव ता. उस्मानाबाद येथे शनिवारी दिनांक 11 जूलै 2020 रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम मा.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते होणार असून सदर श्रमदानात उस्मानाबाद मधील स्वयंसेवी संस्था व महसूल विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. असे तहसीलदार उस्मानाबाद यांनी कळवले आहे.
 
Top