तुळजापुर /प्रतिनिधी-
तालुक्यातील  धनगरवाडी येथील  पोलीस पाटलास मारहाण केल्या प्रकरणी चार जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी दि.६ रोजी धनगरवाडी येथे घडली.
सदर घटनेनंतर पोलीस पाटील विठ्ठल घोडके यांनी नळदुर्ग पोलिसांत तक्रार दाखल केली परंतु या घटनेची तब्बल २४ तास पोलिसांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही.पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाअध्यक्ष हनुमंत देवकते,तुळजापुर तालुका उपाध्यक्ष अभिजीत गंजे-पाटील,सचिव राजकुमार ताटे,जावेद शेख,शिवानंद पाटील,किशोर वाघमारे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी तुळजापुर दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितली  नंतर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
   या घटनेची सविस्तर माहिती अशी की, धनगवाडी येथे शेतरस्ता व शिवरस्त्याचा वाद बऱ्याच दिवसांपासुन होता.याच विषयावर दि.६ रोजी गावपातळीवर या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत कोणताही तोडगा न निघता वादावादीचे स्वरुप प्राप्त झाले.पुढे काही अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन पोलीस पाटलांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला हा प्रकार कळविला.लागलीच धनगरवाडीत पोलीस पथक दाखल झाले.परंतु तु पोलिसांना का बोलावले म्हणत पोलिसांसमोर अमोल  घोडके,बळीराम घोडके,गणेश म दुधभाते,खंडु  घोडके सर्व रा धनगरवाडी  यांनी पोलीस पाटलांस कर्तव्य बजावत असताना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.पोलीस पाटील विठ्ठल घोडके यांनी दिलेल्या  फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६ व ३४ नुसार नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
 
Top