तुळजापूर / प्रतिनिधी-
 शिवसेना मिञ परिवाराच्या वतीने कोरोना संकृटाचा काळात कोरोना रोखण्याची महत्त्व पुर्ण भूमिका बजावणारे व जीव धोक्यात घालुन  नागरी सुविधा पुरवणा-या  न.प. मधील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा कोरोनायोद्धां म्हणून सन्मान करण्यात आला.
तुळजापूर नगरपरिषद च्या सफाई,विद्युत,पाणीपुरवठा,तसेच सर्व कर्मचाऱ्यांना पंचायत समिती सदस्य गजेंद्रजाधव यांच्या हस्ते फेटा,पुष्पगुछ,व मास्क देवुन कोरोनायोद्धा सम्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख नगराध्यक्ष सचिन रोचकरी, शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम, कार्यालय अधिदक्षक वैभव पाठक, शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे,बापुसाहेब नाईकवाडी,अर्जुन साळुंके,चेतन बंडगर,रोहित नागनाथराव चव्हाण,विरेश डोंगरे,स्वच्छता निरीक्षक मुजाईद शेख,लिपीक सज्जन गायकवाड,दत्ता साळुंके,विस्वास मोटे,राजाभाऊ सातपुते,आण्णा पारधे,मनोज हालकुडे,बालाजी पांचाळ,शंकर गव्हाणे,सिद्राम कारभारी,अक्षय काळे,अतुल काळे,सिद्धाराम कुंभार,गणेश वाघोला,राम सिरसट तसेच शिवसैनिक व न. प.चे सर्व कर्मचारी बाधंव उपस्थित होते.
 
Top