तुळजापूर / प्रतिनिधी-
राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी शशिकांत नवले यांची निवड... राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी शशिकांत नवले यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत व राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुज्जम्मील शेख यांच्या आदेशानुसार नियुक्ती पञ देण्यात आले आहे.संघटनेची उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण जवाबदारी श्री.नवले यांना देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी युवा किसान संघटना ही विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यासाठी व शेतकरी वर्गासाठी कार्यरत आहे,शशिकांत नवले यांचा सामाजिक कार्यात सक्रिय पणे सहभाग असतो व त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. व त्यांचा जिल्हयात दांडगा जनसंपर्क आहे या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.
 
Top