उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून चालकासह ट्रक नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिला. ही कारवाई दि.२६ रोजी पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने व त्यांच्या पथकाने केली. यामध्ये चालक धोंडिराम हिरू चव्हाण (रा. जळकोट) हा ताब्यातील ट्रकमधून (क्र.केए ३२ डी २२३३) ७ ब्रास वाळू विनापरवाना वाहून नेत असताना आढळून आला.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक माने यांच्यासह पथकातील हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अविनाश मारलापल्ले आदींनी कारवाई करून चालक चव्हाण व वाळुचा ट्रक नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला. उर्वरित कारवाई ही महसूल प्रशासनाशी संपर्क साधून केली जाणार आहे.

 
Top