उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 जिल्ह्यातील कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या ज्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना  वयाची 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांना अद्याप मुळ वेतनामध्ये अतिरिक्त वाढ देण्यात आलेली नाही. अशा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या वयाचा पुरावा म्हणून महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दि.23 मार्च 2015 नुसार आधारकार्ड, पॅन कार्ड, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडून प्राप्त करुन घेतलेले वयाचे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयामध्ये सादर करावे, जेणे करुन आपणास हा लाभ देण्याची कार्यवाही करणे सोईचे होईल, असे आवाहन कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top