तुळजापूर / प्रतिनिधी-
जे- जे आपणासी ठावे ते-ते ईतरांस सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन   याप्रमाणे सध्या तंत्रज्ञानाचे धडे देत असलेल्या जिल्हा परिषदेच्या  शिक्षिका मंजुषा स्वामी जि.प.प्रा.शा.किणी ता.उस्मानाबाद  आणि रंजना स्वामी  जि.प.प्रा.शाळा काटगाव ता.तुळजापूर  यांनी लाॉकडाऊन  मधील मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून व काळाची गरज ओळखून उस्मानाबाद मधील महिला शिक्षक भगिनींचे व्हाट्सअप द्वारे ऑनलाईन कार्यशाळा घेत आहेत.
 राज्यस्तरावर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन या स्वामी भगिनी उस्मानाबाद मधील महिला शिक्षिकांना जिल्हा मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. जिल्ह्यातील ब-याच महिलांना त्यांनी डायट मार्फत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहेत.त्या प्रशिक्षणाच्या वेळेस पुढील मार्गदर्शनासाठी  whatsapp group  तयार करण्यात आले होते.याच group द्वारे स्वामी भगिणी नेहमीच मार्गदर्शन करत असतात.  पण  लॉकडाऊनच्या  काळात उत्साही महिलांचे नवीन whatsapp group करुन  मिळालेल्या  वेळात  कायर्शाळेचे नियोजन करुन नियमीत कार्यशाळा घेतली आणि शिक्षीका भगिणींचा उत्सफुर्त सहभाग ही मिळाला.विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील च नव्हे तर राज्यातील इतर जिल्ह्यातील (लातुर ,नांदेड, पालघर,नाशिक,बीड,अमरावती,सोलापूर) महिला शिक्षिकाकांचा समावेश आहे.  तंञज्ञाना सारखा अवघड विषय सोपा करुन  महिलां शिक्षीकांना साध्या, सोप्या त्यांच्याच भाषेत समजेल असे मार्गदर्शन करून तंत्रज्ञानातील विविध घटक  शिकवत असल्यामुळे महिला शिक्षीकांचा तंञज्ञाना बद्दल आत्मविश्वास वाढत आहे. गुगल फॉर्म, टेस्ट मोज टेस्ट ,ईमेल करणे, व्हिडिओ क्रिटिंग विविध शैक्षणिक ॲप्स चा वापर  यूट्यूब चैनल तयार करणे ,फ्लीप बुक अशा विविध घटकांवर कार्यशाळा घेण्यात आली. त्याचा वापर महिला भगिनींनी आपल्या शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी करू लागल्या आहेत.  शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे व नवीन विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी प्रत्यक्ष जाता येत नाही म्हणून त्यांनी गुगल फॉर्म चा उपयोग करुन ऑनलाइन फॉर्म तयार केला. तसेच ऑनलाइन टेस्ट शिकल्यामुळे ते आपल्या शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट तयार करुन  व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करू लागल्या .
 विशेष महत्त्वाचे- सर्व महिलांच्या सहमतीने व सहकार्याने पहिली ते आठवी पर्यंत च्या प्रत्येक  विषयातील प्रत्येक घटकावर टेस्ट तयार करण्याचे करण्याचे काम चालु असुन ते डायट उस्मानाबाद च्या वेबसाईट वर लवकरच उपलब्ध होतील.या टेस्ट  जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील  सर्व विद्यार्थ्यांना याचा  उपयोग होणार आहे.प्रत्येक महिला भगिनींनी आपले स्वतःचे यूट्यूब चैनल तयार केले त्यावर उत्कृष्ट शैक्षणिक व्हिडिओ तयार करून सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहेत या सर्व नवनवीन  तंत्रज्ञानाच्या गोष्टी महिला शिक्षिकांना स्वामी भगिनींनी शिकल्यामुळे त्यांचा आनंद त्या ग्रुप वर शेअर करत  आहेत. लॉकडाऊन मध्ये स्वामी भगिनी जवळपास दहा हजार  विद्यार्थ्यापर्यंत महिला शिक्षकांमार्फत पोहोचल्या आहेत.  स्टेटइनोव्हशन अँण्ड रिसर्च’फाँऊडेशन ,( महाराष्ट्र सोलापूर)यांच्याद्वारे ICT ELEARNING SKILL वरील घेण्यात आलेल्या भागावर लवकरच online quiz द्वारे e certificate देण्यात येणार आहे.स्वामी भगिनी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top