उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 कोरोनाचा धोका लक्षात घेता राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी अत्यावश्यक गरज असल्यासच कोषागारासाठी घराबाहेर पडावे. निवृत्तीवेतनधारकांनी घरीच राहुन सुरक्षित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
          सध्या कोरोनाचे संकट असून निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले सुधारित निवृत्तीवेतन प्राधिकारपत्र कोषागार कार्यालयालाही  प्राप्त होतात. तसेच त्यावरच कार्यवाही  केली  जाते. निवृत्तीवेतनधारकांनी त्यासाठी अर्ज देण्याची गरज नाही. तसेच वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10 टक्के वाढ, विक्री केलेली रक्कम 15 वर्षांनी पुनर्स्थापित करण्यासाठी कोषागार कार्यालयाकडे येण्याची गरज नाही. अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत अर्ज देणे आवश्यकच असल्यास अर्ज पोस्टाने, ई-मेलद्वारे पाठवावा,असे आवाहन कोषागार अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top