उस्मानाबाद /प्रतिनिधी-
महाराष्ट्र वस्तु व सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 31 अन्वये प्रत्येक नोंदीत व्यक्तींला दोनशे रुपये किंवा त्यावरील रकमेच्या करपात्र माल, सेवा किंवा दोन्ही मिळून पुरवठा केल्यास नियम 54 प्रमाणे विहित टॅक्स इनव्हाईस तसेच दोनशे रुपये किंवा त्यावरील रकमेच्या करमुक्त माल, सेवा किंवा दोन्ही मिळून पुरवठा केल्यास नियम 49 प्रमाणे विहित BILL OF SUPPLY देणे बंधनकारक आहे.
तसेच कलम 32 नुसार नोंदणीकृत नसलेली कोणतीही व्यक्ती वस्तू , सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठ्यातील कर गोळा करु शकत नाही. नियम क्र.18 नुसार प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीने धंद्याच्या मुख्य ठिकाणी ठळक जागी तिचे नोंदणी प्रमाणपत्र (GSTN Cerificate) लावणे व प्रवेशद्वाराजवळील नामफलकावर तिचा GSTN प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.प्रत्यक्ष माल, सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा करुनही टॅक्स इनव्हाईस न देणे, चुकीचे देणे, इस्टीमेट पावती देणे, पुरवठा केलेल्या मालाचा, सेवेचा किंवा दोन्हींचा तपशील जमा खर्च नोंदवहीला न घेणे हा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 च्या कलम 122 व 132 नुसार गुन्हा आहे. या गुन्हयासाठी दहा हजार रुपये किंवा कर चुकवल्याच्या रकमेइतका जो जास्त असेल तो दंड तसेच 6 महिने ते 5 वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही होवू शकतो, असे राज्यकर सहायक आयुक्त (प्रशासन), वस्तु व सेवा कर कार्यालय, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.