उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 सध्या सर्वत्र वृक्ष लागवडीबाबत विविध प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व संस्थामध्येही वृक्ष लागवड करण्याची उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र पातळीवर अनुक्रमे 50 ते 10 असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येडशी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आळणी येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदचे मख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते बोलत होते.
याप्रसंगी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. योगेश मोरे, आरोग्य वार्धिनी आळणीच्या सामुदायिक वैद्यकीय अधिकारी  डॉ.ज्योती बिरादार, आळणीचे सरपंच श्रीमती चौगुले, पोलिस पाटील श्री.माळी व इतर ग्रामस्थ हजर होते. कोरोना सहाय्यता कक्षाच्या कामाबाबत सरपंच श्री.चौगुले, पोलीस पाटील श्री. माळी, श्री. गायकवाड, सर्व आशा व इतर सदस्यांचे कामाचे कौतूक करुन त्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्राअंतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी व नॉन-कोविड केलेल्या कामाचा आढावा घेतला. यात आळणीचे कर्मचारी श्री.कुंभार, श्रीमती भिंगडे आरोग्य सेविका, श्री. पांडुरंग पांचाळ, श्री.रमेश पांढरे, श्री. व्ही. बी. कांबळे तसेच आशा कार्यकर्ती उपस्थित होते.

 
Top