लोहारा/प़तीनिधी
लोहारा तालुक्यातील बिगर रेशन कार्डधारक मजूराना प्रति व्यक्ति पाच किलो तांदूळ , डाळ मिळनार असल्याचे लोहाराचे पुरवठा अव्वल कारकुन उत्तम मुदिराज यांनी दि.25 जुन 2020 रोजी प्रसिद्धिपत्रकद्वारे जाहिर केले आहे.
 लोहारा तालुका पुरवठा विभागाकडून काढण्यात आलेल्या या प्रसिद्धिपत्रकामधे रेशनकार्ड नसलेल्या तालुक्यातील सामाजिक व आर्थिकदृष्टया कमकूवत , रोजनदारी मजूराना जवळील रास्त भाव दुकान मधे आधारकार्ड दाखउन प्रतिव्यक्ति पाच किलो तांदूळ व प्रति कुटुंब एक किलो चना वितरीत करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. रेशनकार्ड नसनाऱ्या पात्र नागरिकानी आपल्या जवळील रास्त भाव दुकानामधून हे धान्य घेण्याचे आवाहान पुरवठा विभाग अव्वल कारकुन उत्तम मुदिराज यांनी केले आहे.
 
Top