उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेची खरीप हंगाम पिक कर्ज आढावा बैठक खा. ओमराजे निंबाळकर यांनी  दि. 15/06/2020 रोजी घेतली. शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याची सोपी पद्धत अवलंबावी. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याची आवश्यकता आहे. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून पीक कर्जाचे वितरण झाले पाहिजे. पीक कर्जाची पद्धत सोपी करून शेतकर्यांआना कमीत कमी कागदपत्रात टार्गेट प्रमाणे कर्ज वाटप पूर्ण करावे.
बँकांनी ऑनलाईन पद्धतीने स्टॅम्प पेपर शुल्क आकारणी करण्याचे बँकांना अधिकार दिलेले असल्याने कर्जासाठी स्टॅम्प पेपर साठी पायपीट करायला न लावता स्टॅम्प पेपरचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने बँकेतच भरून घ्यावे. तालुक्यातील कोणताही शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही. आपल्या बँकेकडील पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांन कडून फेरफार नक्कल घेऊ नये. तसेच ऊस कारखाण्याचे हमी पत्र मागणी करू नये. त्याऐवजी ऊस लागण पत्र घ्यावे. असे निर्देश खासदार साहेबांनी दिले.
तसेच मुद्रा बँकेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आपला जिल्हा प्रामुख्याने कृषी प्रधान आहे. छोटे उद्योग विकसित होण्यासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून कर्ज वितरण झाले पाहिजे,  यावरही भर द्यावा.
बैठकीप्रसंगी कळंब-उस्मानाबाद विधानसभा आ कैलास घाडगे-पाटील,   लिड बँक मॅनेजर श्री. विजयकर, सर्व बँक मॅनेजर उपस्थित होते.
 
Top