लोहारा/प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा काम करत आहेत. या संसर्गजन्य रोगाच्या निर्मुलनासाठी मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयांच्या शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसाचे वेतन ५ लाख ८ हजार १३१ रुपये मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ साठी सोमवार (दि. १५) रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमार्फत डीडी काढून पाठविण्यात आला.
यावेळी काढण्यात येणाऱ्या धनादेशाच्या रक्कमेचा शाखाधिकारी किशन राव, सहाय्यक शाखाधिकारी गणेशन नायडू यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी सुपूर्द केला. यावेळी कार्यालयीन मुख्य लिपीक राजू ढगे, दत्तु गडवे यांची उपस्थिती होती.
 
Top