तुळजापूर / प्रतिनिधी-
सांगवी मार्डी ते सारोळा-धनेगाव रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करत या रोडची क्वाॅलिटी कंट्रोलकडून तपासणी करण्याची मागणी कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.
तालुकास्तरीय भ्रष्ट्राचार निर्मुलन समितीचे अशासकीय सदस्य धनाजी कुरुंद यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सांगवी मार्डी ते सारोळा या रस्त्याचे काम गेल्या वर्षी करण्यात आले. तर या वर्षी सारोळा ते धनेगाव या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र रस्त्याचा कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याने रस्त्याची खडी उखडली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सदरील रस्त्याची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करावी. निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य धनाजी कुरुंद यांची स्वाक्षरी आहे.
 
Top