उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जलसंपदा विभागाच्या वतीने टेस्टिंग लॅब साठी 2 लाख 51 हजार रुपये निधी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना देण्यात आला देण्यात आला . तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी / कर्मचारी, कंत्राटदार व इतर यांचे मार्फत भुम, परंडा, वाशी, कळंब, तुळजापूर लोहारा, उमरगा, उस्मानाबाद शहर व उस्मानाबाद तालुका या ठिकाणी रहात असलेले कुष्ठरुग्ण, दुर्धर आजारग्रस्त एकल महिला, क्षयरोग व गोरगरीब जनता इत्यादी 1259 लोकांना किराणा (किट) वाटप करण्यांत आलेला आहे.
तसेच कोविड-19 (कोरोना विषाणु) तपासणी प्रयोगशाळा उस्मानाबाद जिल्हयात स्थापन होऊन जिल्हयातील नागरिकांच्या आरोग्य व जिविताच्या दृष्टीने आवश्यक असल्याने सदर प्रयोगशाळेसाठी रुपये 2,51,000/ (अक्षरी रुपये दोन लक्ष ऐकावण्ण हजार फक्त) चा धनादेश जलसंपदा विभागाचे वतीने  श्री. सु.सा.पगार, अधीक्षक अभियंता, श्री कृ.ए.घुगे, कार्यकारी अभियंता, श्री यु.व्ही.वानखेडे, कार्यकारी अभियंता, श्री ए. आर. व्यास, कनिष्ठ अभियंता, श्री वि.एच. डोंगर, प्राथम लिपीक, श्री यू. एस. हावळे, प्राथम लिपिक, श्री पी. बी. गोरे, वरीष्ठ लिपिक यांचे  हस्ते  दिपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद यांचे कडे सुपुर्त करण्यांत आला.
 
Top