लोहारा/प्रतिनिधी
जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे  रोजी जगभरात साजरा केला जातो. सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत प्रजाप्रिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाद्वारे आरोग्य सुरक्षा, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती लोक जनजागृतीकरिता विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑनलाइनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या प्रसंगी सोलापूर उपक्षेत्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी सोमप्रभा दीदी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून ‘प्रभु प्रसाद’ YouTube आध्यात्मिक चॅनेल नुकताच लाँच करण्यात आला. तंबाखू किंवा त्याच्या उत्पादनांचा वापर करण्यास मनाई करण्यासाठी किंवा त्याचा वापर कमी करण्यासाठी जागतिक तंबाखू निषेध दिन साजरा केला जातो. विशेष आरोग्य सुरक्षा दिवस विश्व तंबाखू वर्ज्य दिवस जनजागृती दिवसाचे निमित्ताने जनजागृती करण्यासाठी या  उपक्रमाचे आयोजित केले जाते. नियमित ऑनलाइन मेडिटेशन, पत्र पुष्प, मुरली मंथन आदी कार्यक्रम यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात येत असून या तीन दिवसामध्ये हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती मुरूम सेवाकेंद्राचे संचालक ब्रह्माकुमार राजूभाई भालकाटे यांनी ही माहिती दिली.
 
Top