तुळजापूर /प्रतिनिधी-
तुळजापूर  उपजिल्हा रुग्णालयात  कोरोना पॉझीटीव  नऊ रुग्णांपैकी आज पर्यत सहा रुग्ण बरे होवुन घरी परतले आहेत. त्यापैकी पुणे रिर्टन २१ वर्षीय गर्भवती महिला नुकतीच कोरोना मुक्त होवुन घरी परतली त्यानंतर आज लोहारा तालुक्यातील पाच कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण बरे झाल्याने  त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांना घरी पाठाविण्यात आले.
 या कोरोना मुक्त रुग्णांना पुढील सात दिवस घरीच क्वारटांईन राहण्याचा सुचना दिल्या आहेत. या रुग्णावर डाँ. दिग्विजय कुतवळ यांनी उपचार केले त्यांना सिस्टर भोसले व सिस्टर शितल,मँडम यांनी सहकार्य केले. या कोरोना बाधीत रुग्णांना निरोप देताना उपजिल्हारुग्णालय च्या वैद्यकीय अधिकारी डाँ. चंचला बोडके, कोरोना रुग्णालयाचे प्रमुख डाँ. प्रविण रोचकरी, डा़ँ.अमित शिरशीकर, डाँ.रोचकरी मँडम सह कर्मचारी उपस्थितीत होते.
 
Top