तुळजापूर / प्रतिनिधी
एसटी महामंडळाचा तुळजापूर आगारातील चालक मारुती ठोंबरे यांच्या अकाली निधनानंतर आगारातील सहकारी चालक व वाहकांनी एकत्र येत स्व. ठोंबरे यांच्या कुटुंबियांना १६ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून दिली. तसेच ठोंबरे यांच्या मुलीच्या नावाने बँकेत एक लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली आहे.
तुळजापूर आगारातील चालक मारूती ठोंबरे यांचे पोटदुखीच्या आजाराने नुकतेच निधन झाले. चालक ठोंबरे यांच्या अकाली निधनाने त्यांचा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ठोंबरे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांचा कुटुंबाला मदतीसाठी त्यांचे सहकारी चालक व वाहक सरसावले. यावेळी स्व. ठोंबरे यांच्या मुलीच्या नावे एसटीच्या बँकेत एक लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली. तर १६ हजार ६०० रुपयांची रोख मदत करण्यात आली. यावेळी स्वर्गीय मारुती ठोंबरे यांच्या पत्नी आशा ठोंबरे, आगारप्रमुख राजकुमार दिवटे यांच्यासह आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top