परंडा  / प्रतिनिधी
 प्रहार शिक्षक संघटेच्या पाठपुराव्याला अखेर न्यायालयाकडून मिळाला न्याय शासन परिपत्रक १ मार्च २०१४ अन्वये व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार याचिका कर्ते बाळकृष्ण शिराळकर  रमेश शिवणकर,भैरू गोरे,बालाजी गुंजाळ,अधिकराव वाघमारे,दिगंबर जोशी,दत्तात्रय पवार,शहाजी झगडे, विजय जरांडे, दादासाहेब जगताप या शिक्षकांना न्याय देत आदेश निर्गमित केले.
 परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगतील फरकाचा दुसरा हप्ता १जूलै २०२० रोजी संबंधिताना नियमित वेतना सोबत देण्या बाबतचे पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविले.शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन CMP वेतन प्रणाली कार्यान्वित करून त्या द्वारे वेतन अदाई करणे कामी मास्टर ट्रेनर्स यांची तालुका निहाय नियुक्ती करून सर्व जबाबदारी त्यांचे वर निश्चित करून तातडीने बैठक लावली.
 प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनची दखल घेत तातडीने काही प्रश्न निकाली काढले व उर्वरित काही प्रश्नी कामाला गती देत निकाली काढणेस्तव आश्वासित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय कोलते,शिक्षणाधिकारी श्रीम.रोहिणी कुंभार मॅडम तसेच संबंधित आस्थापनेचे सोमानी ,क्षिरसागर मॅडम,शशिकांत नागटिळक  यांनी शिक्षक हिताला प्राधान्य देत तातडीने प्रश्न निकाली काढले आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,दत्तात्रय पुरी,विशाल अंधारे,दत्तात्रय राठोड,रघुनाथ दैन,अरिफ शेख,फिरोज शेख,  पवार,सुषमा सांगळे-वनवे,  संतुक कडमपल्ले,योगेश चाळक,हनुमंत माने,धम्मदिप सवाई, धनंजय आंधळे,शहाजी झगडे,विनोद सुरवसे,परशुराम लोहार आदिनी दिली.

 
Top