तेर (प्रतिनिधी)
कृषी विभागाच्या वतीने  रूंद सरी वरंबा या आधुनिक पेरणी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून  या पध्दतीचे पेरणी क्षेत्र वाढवावे अशी सुचना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या आधिकाऱ्यांना केल्या
वाणेवाडी ता .उस्मानाबाद येथे   आयोजित महिला शेती शाळा व प्रगतशिल शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या शेतात सोयाबीन रूंद सरी वरंबा  पेरणी पध्दती  पहाणी कार्यक्रमात मुधोळ मुंडे बोलत होत्या.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी मुंढे  म्हणाल्या की, महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान पध्दतीचा वापर करून कृषी क्षेत्रातील  बदलासाठी पुढाकार घ्यावा व  जुन्या पीक पध्दतीवर अवलंबून न रहाता फळबागा लागवड  व शेतीपूरक व्यवसाय करून महिलांनी आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनावे  असे आवाहन  मुधोळ मुंडे यांनी केले.शेतकऱ्यानी सोयाबीन बियाणे ची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणें वाणेवाडी येथे पेरणी केलेल्या रूंद ,सरी वरंबा पध्दतीमधील बारकावे समजून घेतले . यावेळी कृषी अधिक्षक बजरंग मंगरूळकर, जिल्हा कृषी विकास आधिकारी तानाजी चिमणशेटे यांनी महिलां शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले .सुत्रसंचालन कृषी सहाय्यक व्ही.पी. लेणेकर यांनी केले.
या शेतीशाळेस कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद ,उपविभागीय कृषी अधिकारी बी.बी. कोळेकर, तालुका कृषी अधिकारी डी.आर. जाधव , उद्यान पंडीत कृषी पुरस्कार प्राप्त  प्रभावती लामतुरे,  कृषी विभागाचे कर्मचारी ,महाबीजचे आधीकारी,  वाणेवाडी, किणी ,हिंगळजवाडी  येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
 
Top