परंडा/ प्रतिनिधी : -
येथील योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या 306 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.26 जुन ते 3 जुलै या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत. यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार नसून दूर दृष्य श्राव्य माध्यमातून सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत.तसेच मंदिरामध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे यंदा सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह द्वारा होणार आहेत.
पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातून होणार आहेत . कल्याण स्वामी मठ परंडा या फेसबुक पेजवर या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे .या फेसबुक पेजला लाइक करून कीर्तन ,प्रवचन हे कार्यक्रम पाहता येतील . तसेच सामुहिक दासबोध पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे .सर्व भक्तांनी दासबोध पारायण आपल्या घरी करायचे आहे .यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव ‘पारायण आपल्या घरी प्रवचन कीर्तन आपल्या दारी ‘ या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे
पुण्यतिथी उत्सवात स.भ.दतात्रय रत्नाळीकर,स.भ.दामोदर रामदासी, स.भ.डॉ. मंजुषा कुलकर्णी यांची प्रवचन सेवा होणार आहे . तसेच स.भ.प्रिया सुरवसे -पवार ,स.भ.कु मृण्मयी लांडगे,हभप संजयानंद महाराज झानपुरे, स.भ.हनुमंत बुवा ग्रामोपाध्ये , हभप रामभाऊ महाराज निंबाळकर, स.भ.गणेश बुवा रामदासी , स. भ.चि.ओंकार वैद्य ,स. भ. कु.सायली देवधर यांची कीर्तने होणार आहेत.
शुक्रवार दि. 3 जुलै रोजी सकाळी 10.30 वा मिरज येथील वेण्णा स्वामी मठाचे मठपती स. भ. कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे . गुलाल पुष्पवृष्टीसह उत्सवाची सांगता होणार आहे . दर वर्षी होणारा परंडा - डोमगाव पायी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. तरी समर्थ भक्तांनी या सर्व कार्यकमांत सहभागी व्हावे.