उस्मानाबाद/ प्रतिनिधी : -
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तर्फे 25 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीमध्ये महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे साठ कुटुंबांमध्ये आरोग्यदायी उमेद पोषण परसबागांची निर्मिती केली जाणार आहे.
लहान मुले किशोरी गर्भवती स्तनदा माता व वृद्ध व्यक्ती व कुटुंबातील सर्व सदस्य यांचे आरोग्य उत्तम राहावे यादृष्टीने आहारामध्ये रोजच्या 3 ते 5 प्रकारचा वेगळा पालेभाज्या आवश्यक असतो. सदरहू पालेभाज्या आपल्याच घराशेजारी मिळाव्यात या उद्देशाने या परसबागा निर्मिती करण्यासाठी उमेद अभियानात कार्यरत कृषी सखी समुदाय प्रशिक्षण सल्लागार व कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून गावस्तरावर पोषण बाग निर्मितीसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.सदर कॅम्पेन हे 25 जून पासून 15 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने व्यापक प्रमाणात जनजागृती होऊन लोकांमध्ये आरोग्यदायी पोषण बाग बनवण्यासाठी प्रेरणा जागृत केली जाणार आहे आणि या माध्यमातून केवळ पैशाची बचत होणार नाही तर दररोज ताजा भाजीपाला रोजच्या जेवणामध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त स्वयंसहायता गटातील सदस्यांनी पोषण परसबाग तंत्रज्ञान शिकून आपल्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला स्वतः पिकवून आहाराचा दर्जा उत्तम करावा व आरोग्यदायी कुटुंब उभी राहिली असा उद्देश या मोहिमेचा असल्याचे उमेद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी विमला रमेश यांनी सांगितले.
सदरहू अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते व प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद ची संपूर्ण जिह्यातील यंत्रना कार्यरत असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्ताफ जिकरे यांनी सांगितले.