उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छञपती शाहू महाराज यांची २६जून रोजी, १४६वी जयंती साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रा.राजा जगताप यांनी “छञपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य”या विषयावर आपले विचार व्यक्त केले. प्रा.राजा जगताप या प्रसंगी म्हणाले की, छञपती शाहू महाराजांनी गरिबी,विषमता,अज्ञान याचे कारण शिक्षण हेच आहे ओळखले होते म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण कायद्याने बंधनकारक केले होते म्हणून आज शिक्षणात क्रांती झाली आहे तसेच बहुजनांना समानतेने वागवण्यासाठी व त्यांच्या उध्दारासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात १९०२साली मागासवर्गीयांना नोकरीत पंन्नास टक्के आरक्षण ठेवले व त्याची आंमलबजावणी केली.शेतकऱ्यांच्या हक्काच्या व हिताच्या योजना त्यांनी आमलात आणल्या होत्या त्यामुळे आजही छञपती शाहू महाराजांच्या विचाराची देशाला गरज आहे. महाविद्यालयातील ठराविक प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते. सूञसंचालन व आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.
 
Top