उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा (COVID-१९) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विदेशातून आलेले नागरिकांना त्यांच्या तालुक्याच्या शासकीय, खाजगी  रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये  ठेवले आहे. तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमध्ये इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संदर्भात संभाव्य व्यक्तींची तपासणी करुन त्यांना त्यांचे घरीच होम क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेले आहे. अशा व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची दैनंदिन माहिती प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
 या आदेशानुसार जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये खालील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. एम. डी. पतंगे, वरिष्ठ सहाय्यक कार्यकारी अभियंता बांधकाम जि.प.उस्मानाबाद (मो.९४०४२९५१०१), श्री. एल. एस. मांजरे, कनिष्ठ सहाय्यक (मो. ९३२५५४६६४२), श्री. जी. एन. विरगट, भांडारपाल, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, उस्मानाबाद (मो.७७०९४७२८६६), श्री. के.बी.थोरात, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, उस्मानाबाद (मो.९९२२७६९७१२), श्री.एम. एम. पवार, लिपीक-नि-टंकलेखक, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद (मो. २५४५९९४९९१), श्री. एस. एम. हुंबे, वरिष्ठ सहाय्यक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), जिल्हा परिषद, उस्मानाबाद (मो.९८३४६१४४४८) यांची राखीव अधिकारी , कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 
नियंत्रण कक्षांमध्ये नियुक्त केलेल्या वरील नमूद अधिकारी, कर्मचारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करुन त्याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे सादर करावी. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये  स्थापन करण्यात आलेल्या तालुका नियंत्रण कक्षांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना दर तीन तासांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन कोरोना विषाणू (COVID-१९) च्या संदर्भात माहिती घ्यावी. तालुका नियंत्रण कक्षामध्ये नेमलेल्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तालुक्याच्या शासकीय, खाजगी  रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन व्यक्ती आणि  होम क्वारन्टाईन व्यक्तींबाबतची  माहिती  दर तीन तासांनी संकलित करुन जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये नोंद करुन ठेवावी. ही माहिती दररोज सकाळी ११.०० वाजता व सायंकाळी ५.०० वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे सादर करावी.
तालुक्याच्या शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्ती संबंधित आयसोलेशन वॉर्ड, इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन तसेच होम क्वारन्टाईनमध्येच आहेत किंवा कसे ? याबाबत खात्री करणे.
तालुक्याच्या शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्तींच्या आरोग्याची माहिती घेऊन त्याच्या नोंदी ठेवणे. तालुक्याच्या शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्ती अन्य लोकांच्या, जनतेच्या संपर्कात येत नसल्याबाबत खात्री करणे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या शासकीय, खाजगी  रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्तींचे संपर्क क्रमांक संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाकडून प्राप्त करुन घेणे व अशा व्यक्तींना रॅण्डमली संपर्क करुन त्या व्यक्ती संबंधित आयसोलेशन वॉर्ड, इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन तसेच होम क्वारन्टाईनमध्येच आहेत किंवा कसे ? याबाबत खात्री करावी. अशा व्यक्तींच्या आरोग्याची माहिती घेऊन त्याच्या नोंदी ठेवाव्यात. अशा व्यक्ती अन्य लोकांच्या, जनतेच्या संपर्कात येत नसल्याबाबत खात्री करावी. या कामामध्ये हलगर्जी, टाळाटाळ, कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश तात्काळ लागू करण्यात येत असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

 
Top