लोहारा/ प्रतिनिधी
दलितवस्तीसाठी मंजूर झाललेला निधी दलितवस्तीतच खर्च करण्यात यावा, अशा सक्त सूचना जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिगविजय शिंदे यांनी आढावा बैठकीत दिल्या. लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 24 जून 2020 रोजी विविध कामाबाबत अधिकाऱ्यांची अढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी सभापती शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, प्रभारी गटविकास अधिकारी अशोक काळे, साहयक अधिकारी संजय ढाकणे, उपसभापती व्यंकट कोरे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य वामन डावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. दीपक जवळगे,  आदी, उपस्थित होते. यावेळी सभापती दिग्विजय शिंदे म्हणाले, की वैयक्तिक लाभांसह विविध योजनांसाठी समाजकल्याण विभागाने भरीव निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या निधाचा लाभ गरजूंना दिला गेला पाहिजे. यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, विविध योजना गावस्तराव पोहंचल्या पाहिजेत. दलिवस्तीच्या निधीबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने सजग राहून दलित वस्तीचा निधी तेथेच खर्च करण्याच्यासूचना दिल्या.
यावेळी भाजप माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, कमलाकर जेवळे, नेताजी भोकरे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपसथित हाेते.
 
Top