शिक्षण संकुलास कै.बी.एन. देशमुख नामकरणाचा निर्णय 
काटी / प्रतिनिधी-
 तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार बॅरिस्टर बी. एन.देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी औरंगाबाद येथील राहत्या घरी नुकतेच निधन झाले. सोमवार दि.(8) रोजी सकाळी 8 वाजता अॅड. अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा अस्थीकलश येथील मुख्य बाजार चौकात उभारण्यात आलेल्या मंडपात ग्रामस्थांच्या अंतिम दर्शनासाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत ठेवण्यात आला होता. यावेळी पुष्पवृष्टी करत काटीकरांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत आपल्या भुमीपुत्राच्या अस्थीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या आठवणीने काटीकर गहिवरले होते.
सकाळी 8 वाजता येथील मुख्य बाजार चौकात अस्थिकलश यात्रेचे आगमण झाल्यानंतर मंडपात अस्थीकलशाचे सर्व पक्षीय पदाधिकारी, प्रतिष्ठ नागरिक, ग्रामस्थांनी अस्थीकलशाचे अंतीम दर्शन घेतल्यानंतर  काटीचे सुपुत्र असलेल्या व सर्व सामान्यांचे न्यायमूर्ती असलेल्या, मराठवाड्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या, शेतमालाला हमी भाव, कामगारांच्या कष्टाला दाम व गोरगरीबांना न्यायदान देणाऱ्या,न्यायदानाच्या व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून लोककल्याणकारी कार्य करून सामाजिक क्रांतीचे विचार समाजात रुजविणाऱ्या आपल्या भुमीपुत्राला अनेकांनी पुष्पवृष्टी वाहून श्रध्दांजली वाहिली. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वानुमते सरपंच आदेश कोळी यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, अंगणवाडी, आणि केंद्रीय कन्या प्रशालेच्या शिक्षण संकुलास *कै.बी.एन.देशमुख तथा तात्यासाहेब देशमुख शिक्षण संकुल असे नाव देण्याचा निर्णय पारित करण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. सकाळी दहा वाजता अस्थीकलश तुळजापूर येथील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात दर्शनासाठी नेण्यात आला. तुळजापूर येथील दर्शनानंतर दुपारी 12:30 वाजता काटी येथील त्यांच्या शेतामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी त्यांचे जुने सहकारी अॅड. भैरीनाथ साळुंके, माजी सरपंच बापुसाहेब देशमुख, अॅड. अविनाश देशमुख,चेअरमन विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,सतिश देशमुख, प्रदीप साळुंके, अभिमन्यु देशमुख, संदीपान साळुंके, बाबुराव ढगे, जयसिंग सावंत, मोतीराम आगलावे, पत्रकार उमाजी गायकवाड, मकरंद देशमुख, अनिल गुंड, बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड,अनिल बनसोडे,अशोक जाधव, विद्यासागर ढगे,अतुल सराफ,धनंजय देशमुख, अहमदखॉन पठाण, धैर्यशील गाटे, प्रकाश गाटे आदी मान्यवर उपस्थित होते.शाचे काटीकरांनी घेतले दर्शन; बी.एन. देशमुख यांच्या आठवणीने काटीकर गहिवरले

 
Top