उमरगा / प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाव्यवस्थापक  अरविंद बदने यांची परळी वैजनाथ येथे नुकतीच बदली झाली असून या बदलीनिमित्त तर येथील शाखेत नूतन नियुक्तीबद्दल शाखाव्यवस्थापक रोशन पेंदोर यांचा पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई किशोर व्हटकर यांच्या संपर्क कार्यलयाच्या वतीने समोवर (दि. ८) सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना बदने म्हणाले की, मी तीन वर्षे या शाखेत काम केलो. सर्व गावकऱ्यांनी व बँकेच्या ग्राहकांनी वेळोवेळी मला सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी सर्व गुंजोटीकरांचे आभार मानले. यावेळी तुरोरी शाखेचे शाखाव्यवस्थापक महेंद्र देशमाने, उमरगा शाखेचे शाखाव्यवस्थापक अजय रामदासी, नाईचाकूर शाखेचे शाखाव्यवस्थापक श्रीकांत देवकर, बँक ऑफ इंडियाचे मुनाफ इनामदार, किशोर व्हटकर ,अनिल जगताप, हुसेन पीरजादे, जुनेद हताळे, दिलीप सुतार, गुंजोटी बँकेचे गणेश जगताप, धनसिंग मेहता, आशिष बनसोडे, स्वाती नारायणकर, सोनाली फणसे, बँक सखी रेश्मा सवार,  खाजमिया मुजावर, स्वप्नील खमीतकर ,मेघराज पोतदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top