तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात मंगळवार दि.9 रोजी सकाळी  खाजगी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवुन एक अनोळखी इसम भाविक मंदीरात दाखल होताच सुरक्षा रक्षकाने त्यास ताब्यात घेतल्याची घटना मंगळवार दि.9 रोजी सकाळी 11.30 वाजण्याचा सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, सध्या देशात वाहतुक खुली केल्याने खाजगी वाहनांनी भाविक मोठ्या संखेने तिर्थक्षेञ तुळजापूरात दाखल होत असुन असाच एक इसम भाविक मंगळवार मंदिरा समोर येऊन मंदीराचा राजे शहाजी महाध्दार येथील खाजगी सुरक्षारक्षकांची नजर चुकवुन  मंदिरात जाताच मंदिरतील सुरक्षारक्षकाने त्यास हटकताच हा नजर चुकवुन आल्याचे समजातच त्यास ताब्यात घेतले. सदरील इसमास निंबळकर दरवाजा पायऱ्या उतारताना ताब्यात घेतले.
 
Top