लोहारा/ प्रतिनिधी
जय संघर्ष सामजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक  आध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे लोहारा तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे यांनी सर्व वाहन चालवकांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना वायरस मुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनचालकाचा रोजचा दैनदिन खर्च मुलाचे शिक्षण खर्च व कर्जाचे हप्ते भरने अवघड झाल्यामुळे जीवन जगणे मुस्किल झाले आहे. वाहन चालकावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी महराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी, आशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जय संघर्ष समाजिक संस्था लोहारा तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे,  उपाध्यक्ष सुमित झिंगाडे, रमेश होडराव, देवदत्त महाजन, राजेंद्र तिगाडे, बाळू कनुरे, सचिन कोळी, आसलाम खानापुरे, किशोर सुरवसे, आदि उपस्थित होते. 
 
Top