लोहारा/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनिल साळुंके यांनी लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्या सर्वत्र कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आपल्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी सोशल डिस्टन्स चे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरवात करण्यात आली. यावेळी तहसिलदार विजय अवधाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोविंदराव साळुंके, गोविंद बिराजदार, राजेंद्र कदम, सुनील साळुंके, हेमंत माळवदकर, प्रकाश भगत, मिलिंद नागवंशी, पृथ्वीराज जगताप, महेबूब फकीर, संकेत आनंदगावकर, दादा पाटील, शैलेश चंदनशिवे, प्रशांत हाक्के, मनोज देशपांडे, आकाश साळुंके, गोपाळ माने, विशाल बडूरे, रोहन बिराजदार, विशाल मातोळे आदि उपस्थित होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना मास्क व आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
 
Top