तुळजापूर /प्रतिनिधी -
तालुक्यातील  खडकी येथे आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त अजिंक्य बहुउदेशिय सेवाभावी संस्था खडकी,नेहरु युवा केंन्द्र उस्मानाबाद व महा एनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्धमाने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
उस्मानाबाद नेहरु युवा केंन्द्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिन साजरा करण्यात आला. महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक तथा अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान यांनी यावेळी बोलताना सांगितले. “करा योग रहा निरोग” या म्हणीप्रमाणे खडकी येथील युवकांना एकत्रित करुन वेगवेगळ्या योग प्रकाराचे जवळपास दोन तास प्रात्यक्षिके घेऊन हा योगदिन साजरा करण्यात आला. दररोज व नियमित योग केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. व व्यक्ती कायस्वरुपी निरोगी राहतो. म्हणुन प्रत्येकाने एक दिवसापुरते योग दिना दिवशी योग न करता दररोज नियमित योग करावा असेही राम जवान यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे  किशोर जवान,सिध्दु सुरवसे,ज्ञानेश्वर जवान,गणेश जवान,मेघराज सुरवसे, संदेश जवान युवकही इतरही उपस्थित होते.
 
Top