तुळजापूर /प्रतिनिधी -
शहराचा मध्यवर्ती भागात वर्दळीचे ठिकाणी असणाऱ्या जुन्या बस स्थानकातुन सातत्याने पेपरगट्टी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पेपर गठ्ठा चोरणा-यांचा बंदोबस्त करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा पेपरविक्रेता संघटनेने पोलिस निरक्षक यांना निवेदन देवुन केली आहे.
शनिवार  दि20 रोजी पाचच्या सुमारास 500 पेपरचा पार्सल अज्ञात चोरट्याने पळून  नेले या पुर्वीही अनेक पेपरगट्टे पार्सल  चोरी चा घटना घडत आहे या पेपरगट्टे चोरणा-या चा बंदोबस्त होत नसल्याने हा चोरटा निगरगट्ट बनला आहे.
या पार्श्वभूमीवर या भुरट्या चोराला जेरबंद करण्याची मागणीचे निवेदन  सोमवार  दि. 22 रोजी उस्मानाबाद जिल्हा पेपरविक्रैता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज  बागल,  पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, सचिव  कुमार नाईकवाडी, माजी तालुकाध्यक्ष संजय खुरुद, पेपर विक्रेते ,नितीन गायकवाड, गणेश भातुसे, संतोष गायकवाड, गणेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते. 
 
Top