तुळजापूर /प्रतिनिधी -
 तिर्थक्षेञ तुळजापूर च्या घाटशिळेच्ये पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ येथील पंचावन्न वयाचा व्यक्ती कोरोना बाधीत निघाल्याने प्रशाषाणाने तातडीने गाव सील करुन पंचवीस जणांना ताब्यात घेवुन क्वारटांईन केले असुन सिंदफळ येथे तीन दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डाँ. माधुरी डोंगरे यांनी दिली.
सदरील व्यक्तीस सोलापूर येथील हाँस्पीटल मध्ये आठ  दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास 11 जुनला उपचारासाठी नेले होते त्यानंतर ते बरे झाल्याने त्यांना सिंदफळ येथे आणले असता छातीत  दुखू लागल्यामुळे पुनश्च 18 जुनला  सोलापूरच्या रुग्णालयात नेले  उपचारावेळी   सोलापूर येथे त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती ती टेस्ट पॉझिटिव निघाली. सदरील व्यक्तीस बी. पी शुगरचा ञास असल्याचे समजते, सदरील गाव सील करताना  तहसिलदार सौदागर तांदळे, बीडीओ मरोड, पो.नी हर्षवर्धन गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ. सतिश पवार, डाँ. माधुरी डोंगरे, खूमणे पाटील, ग्रामसेवक रेड्डी ,  सरपंच खुंटापळे, उपससरपंच धनके  घाटशिळे, बंडु धनके,  आरोग्य सेवक, सेविका , आशा वर्कर आदी उपस्थितीत होते

 
Top