उस्मानाबाद/ प्रतिनिधी
शहरातील एका सोनाराच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील साडेतीन हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा नोंद झाला आहे.
ही घटना दि.२५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी दैवशाला प्रल्हाद कडेकर (रा. लासोणा) या त्यांची मुलगी ऊर्मिला कुंभार यांच्यासह काळा मारुती चौक, उस्मानाबाद येथील ‘भारत ज्वेलर्स’ येथे कान टोचण्यास गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या नकळत सीमा संतोष पवार (रा. बीजनवाडी ता. तुळजापूर) व सरूजा राजू भोसले (रा. साठेनगर, उस्मानाबाद) या दोघींनी पर्स उघडून पर्समधील साडेतीन हजाराची रोकड चोरून नेली.

 
Top