तुळजापूर / प्रतिनिधी
काही युवा मंडळी नवखे सर्पमिञ   वनक्षेञात भागात जावुन  विषारी साप पकडून जीवघेणे स्टंटबाजी करीत असुन हा प्रकार रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी सर्पमिञांनमधुन केली जात आहे.
नवखे सर्पमित्र हँलिपंड मोरडा आपसिंगा वनक्षेञात जावुन विषारी साप पकडुन त्यांच्यासोबत जीवघेणी स्टंट बाजी करत आहेत त्यांचे हे कृत्ये जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हे   फेसबुकवर हॅन्डलिंगचे फोटो टाकण्याची क्रेज वाढली आहे लाईक, आणि कमेंट साठी हे नवखे तरुण आपले जीवन धोक्यात घालत आहेत तर वनविभागाने  अशा मंडळीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहेत.
तर काही मंडळी  दुर्मिळ साप, पक्षी, प्राणी वनविभागत नोंद न  करता बाहेरील सर्पमित्रा सोबत देवाण ,घेवाण करत आहेत तर उस्मानाबाद जिल्ह्यातील वनविभागाने याकडे ही लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

 
Top