उस्मानाबाद/ प्रतिनिधी
येरमाळा पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आठ वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२५ जून रोजी अटक करून येरमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी बबन आबा शिंदे (रा.पिंपळगाव क. ता. वाशी) याच्यावर सन २०१२ मध्ये दरोड्याचा गुन्हा नोंद आहे. परंतु, तेव्हापासून हा आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे त्यास गुरुवारी (दि.२५) सापळा रचून ताब्यात घेत येरमाळा पोलिस ठाण्याच्या गजाआड केले. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, कवडे, पोना समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top