उस्मानाबाद/ प्रतिनिधी
येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या ३७ तुकड्यावरील ५६ शिक्षक १५ वर्षापासून वेतनापासून वंचित अाहेत. दहा दिवसांत वेतन न दिल्यासस १ जुलैपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा शिक्षणमंत्र्यांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निवेदनातून देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीपतराव भोसले हायस्कूलने ही लाखो विद्यार्थी घडवले आहेत. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी ५६ शिक्षकांच्या वेतनासाठी न्यायालयीन लढा दिल्यावर उच्च न्यायालयाने शिक्षकांचे वेतन करण्याचे शासनाला आदेश दिले. याबाबतचे ४ निकाल न्यायालयाने दिले आहेत. तरीही शासन या शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवत आहेत. याप्रसंगी भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक देशमुख, उपमुख्याध्यापक कोळी, शिक्षक संघाचे मराठवाडा सरचिटणीस पवार, पर्यवेक्षक देशमुख यांच्यासह ५६ शिक्षक उपस्थित होते.

 
Top