तुळजापूर / प्रतिनिधी
 तुळजाभवानी मंदिर प्रारंभी स्थानिकांना खुले करण्यासह सुरवातीला केवळ ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी विविध उपाययोजनांवर मंदिर संस्थानच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंदिर खुले करण्यापूर्वी आणखी बैठका घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यापूर्वी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मंदिरात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. मंदिर संस्थानच्या नवीन प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महंत तुकोजी बुवा, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिप्परसे, पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, जयसिंग पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रदीर्घ लाॅकडाऊन नंतर केंद्र सरकार सह राज्य सरकारने अनलाॅकची घोषणा केल्या नंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार खुले करण्यात येत आहेत. देशाचा काही भागात धार्मिक स्थळे उघडण्यात आली असून महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्याची सर्वाना प्रतिक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी, उपाययोजना संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, सचिव नागेश साळुंके, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, सुधीर कदम, विकास मलबा, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग आदींची उपस्थिती होती.
 
Top