उस्मानाबाद / प्रतिनिधी :
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरूवारी 5 जणांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण तुळजापूर तालुक्यातील असल्याने या तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याचे दिसत आहे.
गुरूवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये तिघेजण सलगरा (दिवटी) येथील तर एक माळुब्रा आणि एक नळदुर्ग येथील आहे. हे पाचही रुग्ण पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कात आलेले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत गुरूवारी 37 जणांचे स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. यातील 32 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर पाचजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 165 वर पोहचली असून 127 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 32 जणांवर उपचार सुरू असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
 
Top