उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 जुगार व मटका खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 कमलाकर पाटील, आदर्श पवार (दोघे रा. बार्शी नाका) व साधु भोसले (रा. गावसुद, ता. उस्मानाबाद) तीघे येथील हॉटेल विश्वजीतच्या पाठीमागे तिरट जुगार खेळत होते. त्यांना मोबाईलसह ३४ हजारांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. दत्ता तोडकरी (रा. नेहरु चौक, उस्मानाबाद) व अशोक वाघमारे (रा. आगडगल्ली, उस्मानाबाद) साळवे चौक येथे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 
Top